- ४० वर्षीय महिलेची पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ ऑक्टोबर २०२१) :- फिर्यादी यांनी आरोपींचे बूट फेकून दिले. त्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली. या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी शुक्रवारी रात्री फिर्यादी आणि त्यांची मुलगी आरोपीकडे गेल्या.
त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना दगडाने मारून जखमी केले. हा प्रकार शुक्रवारी (दि. १) रात्री आठ वाजताच्या दरम्यान बौद्धनगर, पिंपरी येथे घडला. या प्रकरणी बौद्धनगर येथील ४० वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सुनील राम (वय ३०), गुड्डू राम (वय २२, दोघे रा. बौद्धनगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.