- पोलीस भरतीसाठी तब्बल दोन लाखांच्या जवळपास अर्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड आयुक्तालयांतर्गत ७२० पोलीस पदांसाठी शनिवारी २३ ऑक्टोबरला ऑफलाइन लेखी परीक्षा होणार आहे. परीक्षा प्रलंबित राहिल्याने अर्जदार उमेदवारांना प्रतीक्षा होती. आता परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
२०१९ मध्ये पहिल्या टप्प्यातील ७२० पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यासाठी एक लाख ८९ हजार ७३२ जणांचे अर्ज आले. ही परीक्षा शनिवार, दि. २३ ऑक्टोबर, दुपारी ३ वाजता होणार आहे. प्रत्येक परीक्षार्थीला हॉल तिकीट केंद्रावर देण्यात येणार आहे.
गेल्यावर्षी कोरोना महामारी लेखी परीक्षेसाठी १७ ऑक्टोबर ही तारीख जाहीर केली होती. मात्र, इतर घटकांकडून त्याच दिवशी परीक्षा होणार असल्याने संभ्रम निर्माण झाला होता. त्यासाठी परीक्षा पुढे ढकलून २३ ऑक्टोबरला घेण्याचे निश्चित केले आहे. त्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.
















