न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. १६ जाने.) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर राहुल जाधव यांनी क्षेत्रीय कार्यालय व प्रभागस्तरीय विकासकामांची पाहणी केली. उद्यानामध्ये ओपन जीम बसविणे, क्रीडांगणावर लाईटची व्यवस्था करणे, स्वच्छता मोहिमेअंतर्गत वॉर्डात स्वच्छता राखणे, दररोज साफसफाई करणे, राडारोडा उचलणे, निगडीमध्ये विविध ठिकाणी अस्वच्छता आहे, ती स्वच्छता करण्यात यावी.
क्रीडांगणे विकसित करावेत. ‘फ’ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत असलेल्या सद्गुरू दत्त उद्यान यमुनानगर, केशवराव ठाकरे क्रीडा संकुल, मीनाताई ठाकरे व्यायामशाळा, बिंदु माधव ठाकरे व्यायामशाळा, माधव सदाशिव घोळवलकर सास्कृतिक हॉल, मधुकर पवळे क्रीडांगण, अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक हॉल व आदी परिसराची पाहणी केली व कामे पूर्णत्वास कशी येतील याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष पुरवण्याच्या सूचना महापौर राहुल जाधव यांनी केल्या आहेत.
यावेळी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, ‘फ’ प्रभाग अध्यक्षा कमल घोलप, नगरसदस्य प्रवीण भालेकर, पंकज भालेकर, सचिन चिखले, संजय नेवाळे, नगरसेविका योगिता नागरगोजे, कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे, प्रवीण घोडे, मनोज शेठीया, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंखे, प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर उपस्थित होते.











