न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. १६ जाने.) :- मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या संसदेतील अष्टपैलू कामगिरीची दखल घेत, त्यांना सलग पाचव्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. सलग पाच वर्षे पुरस्कार मिळवणारे सोळाव्या लोकसभेतील सलग पाच वर्षे पुरस्कार मिळवणारे श्रीरंग बारणे हे एकमेव खासदार आहेत.
चेन्नई येथील प्राईम पॉइंट फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी लोकसभेतील उल्लेखनीय कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात येतो. खासदारांची संसदेतील कामगिरी, त्यांचा विविध चर्चांमधील सहभाग, उपस्थित केलेल्या प्रश्नांची संख्या आदी विषयांचे आवलोकन करून, लोकसभा सचिवालयामार्फत पुरवलेल्या माहितीवरुन या पुरस्कारासाठी समितीमार्फत निवड केली जाते.
तामिळनाडू येथील राजभवनात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते शनिवारी (दि. १९) रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे.











