न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जाने.) :- पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथील भीमसृष्टीचे येत्या १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी अनावरण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे, अशी माहिती सभागृह नेते एकनाथ पवार यांनी दिली.
२० फेब्रुवारीपर्यत १९ म्युरल्स बसविण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत. या भीम सृष्टीमध्ये डॉ. आंबेडकर यांनी नागपूर येथील दीक्षाभूमी येथे केलेले भाषण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कुटुंबियांसमवेत असलेला फोटो, प्रबुद्ध भारत, मुकनायाक याचे लायब्ररीत टेबलावर लिखाण करतानाच्या आदी प्रतिमांचा समावेश असणार आहे.










