न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जाने) :- विविध मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनने आज शनिवार (दि. १९) रोजी महापालिकेवर निषेध मोर्चा काढला. यात नगरसेवक मयुर कलाटे, तुषार कामठे, सुदेशराजे देशमुख, तेजस्वीनी ढोमसे, सुधीर देशमुख सचिन लोंढे व आयटीयन्स आदींचा समावेश होता.
त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर समस्यांचा पाढाच वाचला. महापालिका नागरी सुविधा देत नाही. पाणी देत नाही, कचरा उचलला जात नाही. मग, आम्ही कर का भरायचा? असा संतप्त सवाल त्यांनी आयुक्तांना केला. आयुक्तांनी यावर बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले आहे.











