- ठेकेदारावर हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑक्टोबर २०२१) :- पुनावळेतील 41 ईस्टेरा या इमारतीचे बांधकाम सुरु होते. फॅब्रिकेशनचे काम इमारतीच्या पाचव्या मजल्यावर करत असताना कामगाराचा तोल जाऊन तो पाचव्या मजल्यावरून खाली पडला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.
ठेकेदाराने कामगाराला सुरक्षेची साधने पुरवली नाहीत. त्यांना धोकादायक काम करायला लावून निष्काळजीपणा केला असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नासीर उस्मान शेख असे मृत्यूमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे.
सोहेल आजीमुद्दीन शेख (वय ३३, रा. कुंदनवाडा, भवानी पेठ, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.