न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आकुर्डी (दि. २४ जाने.) :- जीसीसी ग्रुपच्या वतीने दरवर्षी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने रक्तदान व अवयवदान शिबिराचे आयोजन केले जाते.
यावर्षीही २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रक्तदान व अवयवदानाचे शिबीराचे शनिवार (दि. २६) रोजी सकाळी ८ ते ३ या कालावधीत आकुर्डी येथील गावडे बिझनेस सेंटर येथे आयोजन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी ९८८१२३४३८१ / ९८८११४२४५८ / ९९२२९२५८२० या मोबाईल क्रमांकावरती संपर्क करावा. तसेच शहरातील नागरिकांनी या शिबिरात सहभाग घेऊन, या विधायक कार्यक्रमास हातभार लावावा, असे आवाहन जीसीसी ग्रुपचे शंकर नरवडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.











