- वेश्या व्यवसायातून पाच महिलांची सुटका; एकाला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ डिसेंबर २०२१) :- स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर भोसरी पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. त्यामध्ये पोलिसांनी पाच महिलांची सुटका केली आहे.
ही कारवाई इंद्रायणीनगर, भोसरी येथील ब्रिलियंट युनिसेक्स स्पा अँड सलून येथे करण्यात आली. योगेश चंदरराम मंगावणे (वय ४५, रा. कृष्णानगर, दिघी) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस नाईक बाळासाहेब विधाते यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश हा इंद्रायणीनगर मधील एलोरा कॉम्प्लेक्स मॉल येथे ब्रिलियंट युनिसेक्स स्पा अँड सलून चालवत होता. सेंटरच्या नावाखाली तो वेश्या व्यवसाय चालवत असे. त्याने पाच पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी आणले होते. आरोपी योगेश हा पीडित महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर भोसरी पोलिसांनी कारवाई केली.


















