न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. २८ जाने.) :- त्याग, समर्पण यातूनच यशस्वितेचा राजमार्ग जातो. यातून मिळणारा आनंदच सर्वोत्तम असतो. शिक्षकांनीही विद्यार्थीप्रति असणारे प्रेम व शिकवण्याची तळमेळ महत्त्वाची आहे. या त्याग वृत्तीतूनच संस्था निश्चित मोठी होते. असे प्रतिपादन पत्रकार नंदकुमार सुतार यांनी भोसरी येथे व्यक्त केले. ते डॉ. एस. बी. इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रजासत्ताक दिनाच्या आयोजित समारंभात बोलत होते.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा संपदा पाटील, संचालक राज पाटील, मेजर अमोल कोळी, संजय बोरा, प्रा.शेख विद्यार्थी व पालक उपस्थित होते. सुतार पुढे म्हणाले की, “अपघाती अपंगात्वावर मात करीत स्वत: शिक्षक राज पाटील यांनी ही संस्था सुरू केली. अलपवाधीतच ही शाळा इतर संस्थांना आदर्श ठरत आहे. अपघाताचे भांडवल न करता यशस्वी कसे व्हावे? हे राज यांच्या जीवनाकडे पाहता मार्गदर्शक ठरेल.”
संस्थेच्या शिक्षिका प्रिती घटोळे व अलबी फाभुवणी यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह या द्वारे सत्कार करण्यात आला. संस्थेच्या वतीने अपघाती दोन्ही पायांना अपंगत्व आलेले जीवन मसूरे यांच्या दोन्ही मुलांचा शैक्षणिक खर्च करण्यात येणार आहे.
शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता चव्हाण यांनी आभार मानले.











