न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २८ जाने.) :- शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व CNKM आयोजित कलाविश्व २०१९ या ६ व्या राज्यस्तरीय कला महोत्सव स्पर्धेचे पुणे येथे आयोजन करण्यात आले होते. रविवार (दि. २७) रोजी या स्पर्धेचा समारोप समारंभ पं. जवाहरलाल नेहरु सभागृह, घोले रोड, पुणे येथे पार पडला.
या स्पर्धेत निवडकर्त्यांनी रश्मी अभिजित बाफना यांच्या निसर्गचित्राची उत्कृष्ट चित्र म्हणून निवड केली आहे. त्यांना राज्यस्तरीय कला महोत्सव स्पर्धेतर्फे पारितोषिक देण्यात आले असून, यात रोख रुपये, ट्रॉफी व प्रशस्तीपत्रकाचा समावेश आहे. त्यांच्या चित्राने राज्यस्तरीय स्पर्धेत बाजी मारल्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी बाफना ज्वेलर्सचे आनंद बाफना यांनी त्यांच्या यशाचे कौतुक केले आहे.











