न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. २८ जाने.) :- स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांच्या वतीने गेल्या आठवड्यात प्रभाग स्तरावर मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले होते. चिखली-कुदळवाडी येथील नव-मतदार व युवा मतदार यांची त्यावेळी नोंदणी करण्यात आली होती.
निवडणूक कार्यालयामार्फत छाननी झाल्यानंतर ज्या मतदारांच्या नावांचा मतदार यादीत समावेश झाला आहे, अशा मतदारांना यादव यांच्या पुढाकाराने कुदळवाडी येथील मनपा शाळेत ओळखपत्रांचे नुकतेच वाटप करण्यात आले आहे.











