न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जानेवारी २०२२) :- थेरगाव येथे राहणारी मुलगी इन्टाग्रामवर ‘थेरगाव क्विन’ या नावाने अकाऊंट चालविते. तिने आणि इतर दोन आरोपींनी मिळून अश्लिल भाषा वापरून धमकीचे व्हिडिओ तयार केले. ते व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील अकाऊंटवर टाकले. तसेच ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले.
शनिवारी (दि. २९) सायंकाळी सहाच्या सुमारास हे अश्लील भाषेचे व्हिडिओ पोलीस उपनिरीक्षक महिलेच्या मोबाईलवर आले. सोशल मीडियावरील ही पोस्ट पाहून समाजातील मुलामुलींची नितीभ्रष्ट होण्यास व मानसिक स्थिती बिघडविण्यास आरोपी कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे यांनी शनिवारी (दि. २९) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कुणाल कांबळे (रा. गणेशपेठ, पुणे) आणि थेरगाव आणि चिंचवड परिसरात राहणाऱ्या दोन तरुणी, अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.