न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. १ फेब्रु.) :- संपुर्ण महाराष्ट्रातील लिनीयर अर्बन गार्डन हे सर्वात मोठे (२ कि. मी) लांबीच्या गार्डनचे काम पिंपळे सौदागरमध्ये सध्या सुरु आहे. पिंपळे सौदागर येथील या लिनीयर अर्बन गार्डनमुळे पिंपरी चिंचवडच्या विकासात भर पडणार असून, शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
परंतु, पिंपळे सौदागर ते कोकणे चौक या अडीच किलोमीटर परिसरात विकसित होत असलेल्या लिनिअर गार्डनचे काम अद्याप पुर्ण झालेले नाही. महानगरपालिकेचा हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याने, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे या गार्डनचे रखडलेले काम लवकरात लवकर पुर्ण करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप काटे यांनी केली आहे.











