न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ फेब्रु.) :- पिंपरी बाजारपेठेत पथारी व हातगाडीचालकांचे अतिक्रमण वाढत असून, त्यामुळे स्थानिक व्यापा-यांना व्यवसाय करणे अवघड होत असल्याची तक्रार करण्यात आलेली आहे.
पिंपरी कॅम्पातील श्री लाल बहादूर शास्त्री भाजी मंडईला अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त करण्यात यावे, या मागणीसाठी व्यापा-यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आज शुक्रवार (दि. १ फेब्रु.) रोजी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर भाजीपाला फेकून आंदोलन केले आहे.











