- वल्लभनगर आगारातील ६० टक्के कर्मचारी कामावर हजर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२२) :- मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वल्लभनगर आगारातील ११० एसटी कर्मचारी कामावर परतले आहेत. या चार दिवसात ६० टक्के कर्मचारी कामावर हजर झाल्याने एसटी सेवा पूर्ववत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिवसाला १८ गाड्या धावू लागल्या आहेत.
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी २७ ऑक्टोबर २०२१ असून संपाला सुरवात केली होती. या कर्मचाऱ्यांनी पाच महिन्यापासून बेमुदत संप सुरू केला होता. मात्र, या प्रकरणात न्यायालयाने आंदोलनातील एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशाला मान्य करीत एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेतली असून एसटी कर्मचाऱ्यांचे कामावर परतण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. वल्लभनगर आगारातील चालक, वाहक, चालक कम वाहक, कार्यशाळा कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी मिळून एकूण ११० कर्मचारी हजर झाले आहेत. कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून रुजू करून घेण्यात येत आहे.