- भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे यांचे प्रतिपादन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०२२) :- भारतीय जनता पक्ष तळेगाव दाभाडे शहराच्या वतीने राष्ट्रनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “मन की बात” हा विशेष कार्यक्रम आज रविवार (दि. २९) रोजी सकाळी ११ वा. समाजमंदिर, कडोलकर कॉलनी येथे भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव, पश्चिम महाराष्ट्र मन की बात संयोजक अमित गोरखे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष रविंद्रनाथ दाभाडे, तळेगाव दाभाडे नगरीचे संस्थानिक सत्यशीलराजे दाभाडे सरकार, किसान मोर्चा प्रदेश सचिव संतोष दाभाडे, जिल्हा कोषाध्यक्ष इंदरशेठ ओसवाल, उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे, गटनेते अरुण भेगडे, नगरसेवक अमोल शेटे, नगरसेविका शोभा भेगडे आदी उपस्थित होते.
अमित गोरखे म्हणाले, मन की बात च्या माध्यमातून गेले ८९ महिने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेमध्ये प्रेरणादायी जागृती करण्याचे काम करत आहेत. मन की बात या कार्यक्रमाद्वारे देश-विदेशातील घडत असलेल्या प्रेरणादायी घटना तसेच सामाजिक काम या कार्यक्रमाद्वारे अखंडपणे प्रसारित होत असते. याला सर्वदूर नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. आज मावळवासियांनी हा कार्यक्रम आयोजित करून नागरिकांमध्ये चांगला संदेश दिला आहे.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्तविक शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने यांनी तर सूत्रसंचालन सरचिटणीस प्रमोद देशक, स्वागत शक्तीकेंद्रप्रमुख अमेय झेंडआणि आभार प्रदर्शन मन की बात संयोजक हिम्मतभाई पुरोहित यांनी केले.