न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०२२) :- जाधववाडी चिखली येथील रामायण मैदानात आमदार महेश लांडगे यांनी भव्य बैलगाडा शर्यत आयोजित केली होती. ती शर्यत पाहण्यासाठी फिर्यादी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दोघांसोबत गेले होते. बैलगाडा शर्यत पाहत असताना मैदानावर शर्यत पाहणा-या लोकांची गर्दी झाली.
त्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या गळ्यातील २ तोळे वजनाची ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन हिसका मारून तोडून चोरून नेली. हा प्रकार शनिवारी (दि. २८) दुपारी सव्वा बारा वाजता घडला.
सुरज मरगु बोटे (वय २४, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.















