- मुळशीतील हिरा-राजा व धायरीतील हिरा मोतीला मान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे २०२२) :- श्री संत तुकाराम महाराजांच्या पायी पालखी सोहळ्यासाठी मुळशीतील ज्ञानेश्वर उद्धव शेडगे यांच्या हिरा – राजा व धायरी येथील सागर टिळेकर यांच्या हिरा मोती या बैलजोडीला मान मिळाला आहे. चौघड्यासाठी जालिंदर यशवंत बोत्रे यांच्या बैलजोडीला मान मिळालाआहे.
या बैलांची निवड संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे. वय, छाती, शिंगे, वशिंड, रंग, शेपटी, खूर, चाल आणि रथ ओढण्याची क्षमता या निकषांनुसार पारदर्शीपणे सर्व बैलजोडींचे परीक्षण करण्यात आले. जी बैलजोडी पालखी रथाला शोभेल अशा दोन बैल जोडींची निवड रविवारी जाहीर करण्यात आली.
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाला जोडण्यासाठी सक्षम बैलजोडींचा शोध घेण्यासाठी इच्छुक बैलजोडी मालकांकडून अर्ज मागविले होते. यासाठी पंधरा जणांनी अर्ज संस्थानकडे सादर केले होते. चौघड्याच्या गाडीसाठी केवळ तीनच बैलजोडी मालकांचे अर्ज आले होते.















