- कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने पालिकेचे नियोजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे २०२२) :- देशभरात करोना प्रतिबंधक लसीकरण कमी होत असल्याने केंद्र सरकारने सर्व राज्यांना १ जूनपासून ”हर घर दस्तक” या मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
विविध स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, आशा स्वयंसेविका, विविध सोसायट्या यांच्या मदतीने पिंपरी – चिंचवड शहरात ही मोहिम राबविली जाणार आहे. करोनाच्या लसीकरणापासून एकही नागरिक वंचित राहू नये, या दृष्टीने नियोजन केले जाणार आहे.
एकही नागरिक करोना लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी घरोघरी जाऊन करोना लसीकरण मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेचा दुसरा टप्पा १ जूनपासून सुरू केला जाणार आहे. स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट व इतरांच्या मदतीने ही मोहिम राबविली जाणार आहे, अशी माहिती पालिकेचे अति. आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली.















