न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे २०२२) :- पुणे-मुंबई महामार्गावर पहाटे रस्त्याचे काम सुरू असताना पुण्याकडून येणाऱ्या एका ट्रकने कामगारांना ठोकर दिली. अपघाता नंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पलायन केले आहे. अपघातात एका कामगाराचा जागेवरच मृत्यू झाला असून, इतर चार ते पाच कामगार जखमी झाले आहेत.
हा प्रकार रावेतच्या समीर लॉन्सजवळ सोमवारी (दि. ३०) पहाटे साडेतीनच्या दरम्यान घडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. पुढील तपास रावेत पोलीस करीत आहेत.















