- अन्यथा त्या वाहनांवर होणार कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे २०२२) :- जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्यामुळे विद्यार्थी व शाळा प्रशासन यांची वाहतूक करणाऱ्या परिवहन संवर्गातील वाहनांना वैध योग्यता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरणही करावे, असे आदेश मोशी येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे नुकतेच दिले आहेत.
वैध नसलेल्या वाहनांमधून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करू नये, असे करताना आढळल्यास मोटार वाहन कायदा १९८८ व केंद्रिय मोटर वाहन नियम १९८९ अंतर्गत योग्य ती कारवाई केली जाईल.
त्यामुळे विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांनी योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण करण्याचे आवाहन मोशी येथील उप प्रादेशिक परिवहन विभागाकडून शहरातील स्कूल बस, व्हॅन चालकांना करण्यात आले आहे.


















