- जवळपास कोटींचा गुटखा जप्त; पोलिसांची मोठी कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै २०२२) :- नाशिक -पुणे महामार्गावरून पुणे येथे विक्रीसाठी रविवारी (दि. १०) पहाटे पाचच्या सुमारास अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो जाणार असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वाकी खुर्द परिसरात नाशिक-पुणे महामार्गावरील रोहकल फाटा येथे सापळा रचून कारवाई केली.
रोहकल फाटा येथे आरोपीचा टेम्पो आला असता पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली. टॅम्पोमध्ये आरएमडी पान मसाला व एम सुगंधी तंबाखु असलेला एकूण ९१ लाख २० हजार रुपये किमतीचा गुटख्याचा माल मिळून आला.
गुटखा व टेम्पो असा एक कोटी एक लाख २० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. गणेश विठ्ठल भाडळे (वय ३२, रा. कोयाळी, ता. खेड, जि. पुणे) असे अटक केलेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे.