- पुढील सुनावणी १९ जुलैला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जुलै २०२२) :- ओबीसी आरक्षणाचा बांठिया आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला असून पुढील सुनावणी १९ जुलैला होणार आहे. महाराष्ट्राने न्यायालयात ट्रिपल टेस्टची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे मध्य प्रदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्राला देखील ओबीसी आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पण यावर अद्याप चर्चा झाली नाही. आज सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी झाली असून निवडणूक आयोगाला आपली बाजू मांडण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. पण ज्याठिकाणी निवडणूक प्रक्रिया सुरू आहेत. त्याठिकाणी हस्तक्षेप करणार नाही. निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या ठिकाणी ओबीसी आरक्षणाविना निवडणुका घ्या, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. त
सेच आगामी निवडणुकीबाबत ज्याठिकाणी अद्याप प्रक्रिया सुरू करण्यात आली नाही, तेथील निवडणुका एक आठवडा पुढे ढकलण्यात याव्यात, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणासह होण्याची शक्यता आहे.