न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जुलै २०२२) :- पुणे शहरात गेल्या दोन दिवसापासून संततधार पाऊस सुरु आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी अपघातही झाले आहेत. अशातच दुर्दैवी घटना घडली आहे.
सकाळी दूध आणायला जात असताना २० वर्षीय तरुणाचा हाय टेन्शन वायरला पाय लागल्याने जागीच मृत्यू झाला आहे. रोहित थोरात असे मुलाचे नाव आहे. पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील दत्तवाडीमध्ये ही घटना घडली आहे.
रस्त्यांवर जागोजागी पाणी साचल्याने दिसून आले आहे. अनेक भागात वाहतूककोंडीला नागरिक सामोरे जात आहेत. रस्त्यांची अवस्था बिकट झाल्याने अनेक भागात खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी झाडपडीच्या घटनाही झाल्या आहेत. त्यामुळे रस्त्याने प्रवास करताना नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहनपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.














