न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच येत्या दोन दिवसात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यामार्फत वर्तवण्यात आलेली आहे.
त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रातील बालवाडी / प्राथमिक / माध्यमिक तसेच सर्व खाजगी (अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित) शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा पालिका आयुक्तांनी निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार शहरातील शासकीय आणि खाजगी शाळांना बुधवार दि. १३ ते गुरुवारी दि. १४ जुलैपर्यंत सुट्टी राहील.