- २६ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०२२) :- इशारे करून आरोपीने फिर्यादीचा पाठलाग केला. तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. याबाबत फिर्यादीच्या पतीने आरोपीला समजावून सांगितले. त्यानंतरही आरोपीने फिर्यादीचा वेळोवेळी पाठलाग करून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. ११ जुलै रोजी आरोपीने फिर्यादीच्या घरासमोर येऊन त्यांना वाईट इशारे करून जोरजोरात आवाज दिला.
फिर्यादीला भेटण्यासाठी घराबाहेर बोलावून त्यांच्या घरात घुसण्याचा आरोपीने प्रयत्न केला. तू भेटली नाहीतस, माझ्याशी मैत्री ठेवली नाहीस तर तुझी बदनामी करेन, तुला सोडणार नाही, अशी धमकी आरोपीने दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार जून २०२१ ते ११ जुलै २०२२ या कालावधीत धावडे वस्ती भोसरी येथे घडला. २७ वर्षीय पीडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नितीन संजय गुडदे (वय २६, रा. दिघी रोड, भोसरी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.