न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जुलै २०२२) :- दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने रविवारी (१७ जुलै) चिंचवड येथे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसिध्द निर्माता व दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि ज्येष्ठ निर्माते व लेखक सचिन मोटे यांच्यासोबत दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी गोस्वामी आणि मोटे यांना मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात रविवारी सायंकाळी ५:३० वाजता गोस्वामी आणि मोटे यांना ‘दिशागौरव’ पुरस्कार व मानपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. त्यानंतर, प्रसिध्द अभिनेता व लेखक संकर्षण कऱ्हाडे हे गोस्वामी आणि मोटे यांच्याशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती संस्थेच्या वतीने प्रसिद्धीस दिली आहे.














