- आठ लाखांची रक्कम दिली परत मिळवून…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२२) :- फोनवरून वृद्ध महिलेचा विश्वास संपादन करून महिलेची १० लाखांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार सांगवी येथे घडला. महिलेने तात्काळ पोलिसात धाव घेतली आणि पोलिसांनी लगेच कार्यवाही करून आठ लाख रुपये रक्कम महिलेला परत मिळवून दिली.
सुषमा संभाजी जावळे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ६ जुलै रोजी त्यांना अनोळखी फोनवरून फेक कॉल आला. फोनवरील व्यक्तीने फिर्यादीस एमएसईबी बिल थकले असून बिल भरले नाही तर लाईट कट करण्यात येईल, असे सांगितले.
त्यांनंतर फिर्यादीस एक अॅप्लिकेशन मोबाईलवर डाऊनलोड करण्यास सांगून त्यांच्या खात्यातून १० लाख १० हजार १२० रुपये ट्रान्सफर करून घेतले. सांगवी पोलीस पुढील तपास करत आहेत.