न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२२) :- जुळ्या मुलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोणावळा इथल्या व्हिला रिसॉर्ट इथे नाशिकमधील पवार कुटुंब आले होते. १३ जुलैला संध्याकाळी सातच्या सुमारास कुटुंबीयांचे लक्ष नसतांना दोन वर्षाचा मुलगा हा स्विमिंग पुलच्या ठिकाणी आला आणि पाण्यात पडला.
तो दिसत नसल्याने त्याचा शोध घेण्यास कुटुंबीयांनी सुरुवात केली असता तो पाण्यात असल्याचे आढळून आले. तोपर्यंत मुलाचा मृत्यू झाला होता. शिवबा अखिल पवार असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. या प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचे लोणावळा पोलिसांनी सांगितले.