न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२२) :- डंपर हा चाकणहून भोसरीच्या दिशेने येत होता. तेव्हा धावडे वस्तीजवळ येताच डंपरचे पुढील दोन्ही टायर फुटले. दुभाजक तोडून डंपर दुसरी लेन ओलांडत थेट दुकानात शिरला.
लेन सोडून जात असताना डंपरने व्हॅगन आरला धडक दिली. ही घटना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. दुकानातील एक कर्मचाऱ्यासह डंपर चालक आणि आणखी एक असे तिघेजन जखमी झाले आहेत. बसवराज असं डंपर चालकाचं नाव आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.