न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२२) :- पिंपरीतील संत तुकारामनगर येथे आज मंगळवारी (दि. १९) सकाळच्या सुमारास वायसीएम रुग्णालयाच्या मागील बाजूला भीषण आग लागल्याची वर्दी पालिकेच्या अग्निशामक विभागाला मिळाली. मोठ्या प्रमाणावर उंचच उंच धुर पसरला होता.
अग्निशमन विभागाचे वल्लभनगर मुख्य केंद्राचे दोन, चिखली आणि भोसरी उपकेंद्राचे प्रत्येकी एक असे चार बंब घटनास्थळी दखल झाले. आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरु होते. नेमकी आग कशाने लागली कळाले नाही. तसेच घटनेतील जीवित अथवा मृतांचीही अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.