न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०२२) :- नवी सांगवीतील एस एस ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या दुकानातून सोन्या-चांदीचे दागिने नेले. फिर्यादी यांच्या सांगण्यावरून त्यांच्या मित्राच्या श्री गणेश ज्वेलर्स या दुकानातून देखील सोन्या-चांदीचे दागिने नेले.
दोन्ही दुकानातून आरोपीने ५६०.७९० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ३९६.५० ग्रॅम चांदीचे असे एकूण ३१ लाख ९२ हजारांचे दागिने नेले. त्याबदल्यात आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला २४ कॅरेट सोन्याचे बिस्कीट आणि चोख चांदी देण्याचे आश्वासन दिले. मात्र ते आश्वासन पूर्ण न करता आरोपीने फिर्यादिंची फसवणूक केली.
हा प्रकार ४ ते ११ नोव्हेंबर २०२१ या दरम्यान एस. एस. ज्वेलर्स आणि श्री गणेश ज्वेलर्स येथे घडला. शकील शहाबुद्दीन शेख (वय ३४, रा. पिंपळे गुरव) यांनी गुरुवारी (दि. २१) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमित शेट्टी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.