न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०२२) :- ऑफीसमधील एका तरुणीशी आरोपीचे प्रेमसंबंध होते. मात्र त्याच्या या प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पत्नीचा आरोपी पतीने राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून खून केला. त्याने कोणाला संशय येऊ नये म्हणून घराला बाहेरून कुलूप लावले होते.
वाकड येथील भूजबळवस्तीत मंगळवारी (दि. १९) ही घटना घडली. बुधवारी उशीरा हा प्रकार समोर आला. किर्ती आशिष भोसले (वय १९) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे.
मयत विवाहितेच्या नातेवाईकांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आशिष भोसले (वय २३ रा. भूजबळवस्ती, वाकड) असे फरार पतीचे नाव आहे. हिंजवडी पोलीस पतीचा शोध घेत आहेत.