न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जुलै २०२२) :- बहिण भावाचे नाते अधिक दृढ करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. येत्या ११ ऑगस्टला रक्षाबंधन सण साजरा होणार असून यानिमित्त पोस्टाने बहीण भावाला बांधत असतानाचे चित्र असलेले खास पाकीट विक्रीसाठी उपलब्ध केले आहे.
पोस्ट पाकिटाची किंमत दहा रुपये असून पोस्टेज चार्जेस वेगळे द्यावे लागणार आहेत. रक्षाबंधन सणानिमित्त उपलब्ध करण्यात आलेले हे पाकीट प्लास्टिक कोटेड असल्याने पावसातही त्याची सुरक्षित डिलिव्हरी होईल. लाडक्या भाऊरायाला बहिणीने पाठविलेली राखी सुस्थितीत प्राप्त होईल.















