न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जुलै २०२२) :- राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा शुक्रवारी सायंकाळी झाली. त्यात सुमी या बालचित्रपटास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सुमी फेम आकांक्षा पिंगळे ही वल्लभनगर येथे वास्तव्यास असून तिचे वडील लक्ष्मण पिंपळे हे एका कंपनीत नोकरीस आहेत तर आई गृहिणी आहे. मुलीला पुरस्कार मिळाल्याने पिंगळे कुटुंब हरखून गेले आहे.
शुक्रवारी सायंकाळी पुरस्काराची बातमी कळताच वल्लभनगरात आनंदोत्सव करण्यात आला आहे. सातवीनंतरच्या शिक्षणासाठी सुमीचा संघर्ष या चित्रपटातून दाखविला असून या चित्रपटाची निर्मिती हर्षल कामत यांनी केली आहे. तर दिग्दर्शन अमोल गोळे यांनी केले आहे. तर आकांशाने सुमीची भूमिका केली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण कल्याणजवळील शहापूर येथे झाले आहे.
माझ्या चित्रपटास पुरस्कार मिळाला. काय बोलावं कळत नाही. मला अभिनय करणे आवडते. आता शिक्षण सुरू आहे. भविष्यात यशस्वी अभिनेत्री व्हायचे आहे. कलेचे शिक्षण घ्यायचे आहे.
– आकांशा पिंगळे, बालकलावंत…