न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ ऑगस्ट २०२२) :- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती वारंवार भांडण करून मारहाण करत होता. त्याने सोमवारी पुन्हा पत्नीशी भांडण केले. त्यावेळी तिच्या डोक्यात कडप्पा फरशी मारली. यात पत्नीचा मृत्यू झाला.
हा प्रकार सोमवारी (दि. १) पहाटे तीनच्या दरम्यान घटना घडली. ललिता रमेश पुजारी (वय ३०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलीस कर्मचारी श्रीकांत चंद्रकांत गायकवाड यांनी याप्रकरणी सोमवारी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. रमेश हनुमंत पुजारी (वय ३५, रा. काळाखडक, वाकड) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे.