न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ ऑगस्ट २०२२) :- पिंपळे गुरव येथील पेरुच्या बागेजवळून फिर्यादी हे रिक्षा (एमएच १४ एचएम ६१२८) घेऊन जात होते. त्यावेळी दुचाकीवरून तीन अज्ञात इसम आले. त्यांनी फिर्यादींची रिक्षा थांबवली. त्यांचे चेहरे रुमालाने बांधले होते.
त्यांनी फिर्यादीना पिंपळे निलखला रस्ता कोठून जातो? म्हणून पत्ता विचारला. फिर्यादीजवळ येवून पत्ता सांगत असताना चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादी जवळील मोबाईल घेऊन पळ काढला.
हा प्रकार सोमवारी (दि. १) पहाटे चारच्या दरम्यान घडला. हणुमंत लक्ष्मण थोरात (वय ४५ रा. फुगेवाडी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी तीन अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















