न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ ऑगस्ट २०२२) :- केकस एन मोअर ऑन केक डिलिव्हरी इन पुणे या वेब पेजवरील मोबाईल क्रमांकावर फिर्यादीने फोन करून केकची ऑर्डर दिली. त्यानंतर त्या क्रमांकावरून अज्ञात व्यक्तीने फिर्यादीला फोन केला.
केकचे ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी फिर्यादीस व्हाट्सअप द्वारे क्यूआर कोड पाठवून तो स्कॅन करण्यास सांगितला. फिर्यादीने क्यूआर कोड स्कॅन केला असता अज्ञात व्यक्तीने फिर्यादीच्या बँक खात्यातून एक लाख ६८ हजार २३० रुपये ट्रान्सफर करून फिर्यादीची फसवणूक केली.
हा प्रकार ४ मार्च २०२२ दरम्यान मोशीत घडला. महिलेने सोमवारी (दि. १) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला.