न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रु.) :- जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याचा पिंपरी चौकातील आंबेडकर पुतळ्यासमोर पिंपरी-चिंचवड शहर भाजपकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, पक्षनेते एकनाथ पवार, माजी उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेवक विलास मडिगिरी, उमा खापरे, बाबासाहेब त्रिभुवन, आशा शेंडगे, अमोल थोरात, विजय शिंदे, दीपक नागरगोजे, शशिकांत कदम, शांताराम भालेकर, राजू दुर्गे, महेश कुलकर्णी, सुरेश भोईर, नेहूल कुदळे, नामदेव ढाके, सुजाता पालांडे, शोभा भराडे, संजीवनी पांडे, दीपाली दानोकर आदी उपस्थित होते.
शहिदांच्या कुटुंबियांना भावनिक, सामाजिक, आर्थिक अशी सर्व प्रकारची मदत करणं ही भारतीयांची प्रथम जबाबदारी आहे, असेही निषेध सभेत सांगण्यात आले.