न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ ऑगस्ट २०२२) :- मावळातील विसापूर किल्ल्यावर मद्यपान करणे, गुटखा खाणे, सिगारेट ओढणे असे प्रकार आढळल्याने संबंधित तरुणांना काही शिवभक्तांनी कानशिलात लगावत खडे बोल सुनावले. मद्यपान करणाऱ्या काही जणांना रंगेहाथ पकडण्यात आल्यानंतर काही जणांना उठाबशा काढायला लावली.
गडकिल्ल्यावर पार्टी करणे, गाण्यावर नाच करणे, मद्यपान, धांगडधिंगा, असे गडकिल्ल्याचे पावित्र्य जाईल अशा गोष्टी करू नयेत असे आवाहन वेध सह्याद्री ग्रुप कडून करण्यात आले आहे. मद्यपान करणाऱ्या काही जणांना रंगेहाथ पकडण्यात आल्यानंतर त्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली.