न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ ऑगस्ट २०२२) :- राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे, प्रवेश अर्ज शुल्क भरणे आणि प्रवेश अर्ज निश्चित करणे यासाठी २७ ऑगस्ट ही अंतिम मुदत आहे.
विविध व्यवसायनिहाय प्रवेशासाठी उपलब्ध जागा; तसेच व्यवसाय अभ्यासक्रमाची माहिती आणि प्रवेश प्रक्रियेसंदर्भात माहिती विभागाच्या http://www.dvet.admission.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. आयटीआयमधील सर्व व्यवसायांसाठी एकूण उपलब्ध जागांच्या ३० टक्के जागा महिला उमेदवारांकरिता राखीव असल्याचे डीव्हीईटीने स्पष्ट केले.