न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ ऑगस्ट २०२२) :- पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २ ऑगस्टला रात्री १०:२० च्या दरम्यान गस्त घालत असताना सर्वे नंबर १३६, मोहननगर, चिंचवड येथे एकजण क्रिकेट मॅचवर बेकायदेशीर बेटिंग (सट्टा) लावत आहे, अशी पोलिसांना खात्रीशीर बातमी मिळाली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन दरोडा विरोधी पथकाने त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला व छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले. इंडिया-वेस्ट इंडिज टी २० सामन्याचे मोबाईलमधील CRICKET MAZA, Cricket line guru या अँपद्वारे बेटिंग घेत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून १,१४,५४० रुपये किंमतीचे एकूण ६ मोबाईल फोन, इंटरनेट राउटर मुद्देमाल मिळाला आहे.
विनायक शेलार, (वय ५० वर्षे, रा. मोहननगर चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७ चे कलम ४ व ५, इंडियन टेलिग्राफ अँक्ट २५ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.