न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑगस्ट २०२२) :- कंपनीच्या शटरचा पत्रा उचकटून चोरट्यांनी दोन लाखांचा माल लंपास केला. ही घटना तळवडे येथे घडली. या प्रकरणी कंपनीचे मालक मुकुंद बळवंतराव लेणेकर (रा. देहू-आळंदी रोड, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी यांची गट क्रमांक ५० येथे कंपनी आहे. कंपनीचा पत्रा उचकटून चोरटा आत शिरला. कंपनीतून दोन लाख ५०० रुपये किमतीचा माल चोरला. हा प्रकार गट क्रमांक ५० तळवडे येथे घडला. कंपनीचे मालक मुकुंद बळवंतराव लेणेकर (रा. देहू-आळंदी रोड, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यावर चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.