न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑगस्ट २०२२) :- गाडीतून जात असताना आरोपीने त्यांची गाडी निगडीतील सेंट्रल बँकेच्यापुढे रोडवर आडवे झोपून आडवली. फिर्यादी काय झाले? हे पाहण्यासाठी पाण्याची बॉटल घेऊन त्याच्या जवळ गेले. यावेळी त्याने उठून फिर्यादीच्या पोटाला चाकू लावून मला १५ लाख रुपये दे नाही, तर तुला मारून टाकेन अशी धमकी दिली.
ही घटना भरदिवसा निगडी प्राधिकरण येथे शुक्रवारी (दि. ५) दुपारी साडेतीन वाजता घडली. तेजस रंजित फाळके (वय. ३० रा. निगडी प्राधिकरण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी सिद्धार्थ ऊर्फ फकिरा नागोराव (वय २६, रा.वसमत, हिंगोली) याला अटक केली आहे. तसेच, कपील सतीश फाळके (रा. सातारा) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















