न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑगस्ट २०२२) :- वास्तुशास्त्र तज्ज्ञाने कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या वास्तुशास्त्र तज्ज्ञाचे नाव मारुती तरटे असे आहे. आत्महत्येपुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये शेजारी राहणाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले होते.
तसेच त्रास देणाऱ्या दोन जणांसह दोन महिलांची नावे नमूद केली होती. हा प्रकार २ जुलै रोजी नवी सांगवीतील विद्यानगर येथे घडला. होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून ६ ऑगस्ट रोजी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तसेच चौकशी करून अशोक जानराव, कुणाल जानराव आणि दोन महिलांना अटक केली.















