न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑगस्ट २०२२) :- घरासमोरील गाडी बाजूला घेण्यास फिर्यादीने सांगितले. या कारणावरून त्याने फिर्यादीला शिवीगाळ केली. यातून दोघांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर आरोपीने फिर्यादीला गेटच्या बाहेर बोलावून हाताने मारहाण केली.
तसेच इतर आरोपींही त्यांना पाईपने मारहाण केल्याने ते जखमी झाले. ही घटना मोशीत घडली. नीलेश सोपान तळेकर (रा. नागेश्वर कॉलनी, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार शुभम साबळे (रा. शिवजीवाडी) याला अटक केली आहे. तर अतुल तोत्रे (वय २७), गणेश तोत्रे (वय २९), अजय मुंढे (वय १९, तिघे रा. नागेश्वर कॉलनी, मोशी) व अनोळखी दोन जणांवर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.