न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑगस्ट २०२२) :- रहाटणी चौकात गुरुवारी (दि. १८) दुपारी पॉपी स्ट्रॉ विक्री सुरु असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रहाटणी चौक येथे कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले.
त्यांची झडती घेतली असता एकाकडे मोबाईल फोन, दुचाकी आणि १४ हजार २२० रुपयांचा पॉपी स्ट्रॉ मिळून आला. तर दुसऱ्याकडे ४७ हजार २५० रुपयांचा पॉपी स्ट्रॉ, ३२ हजार ८०० रुपयांचा अफिम आणि मोबाईल फोन आढळून आला. हा माल आरोपींनी राजस्थान येथून आणला असल्याचे आरोपींनी सांगितले.
पोलीस हवालदार प्रदीप शेलार यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सावळारा बिरदाराम बिष्णोई (वय २८, रा. पिंपळे गुरव. मूळ रा. राजस्थान), बाबूराम ढोकळाराम बिष्णोई (वय 45, रा. पिंपळे गुरव, मूळ रा. राजस्थान), सुरेश (मूळ रा. जोधपूर, राजस्थान) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत.
















