न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑगस्ट २०२२) :- भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न, राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या कार्यक्रमास उप आयुक्त रविकिरण घोडके,अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.पवन साळवे, विशेष अधिकारी किरण गायकवाड,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल,जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, मनोज माछरे तसेच कर्मचारी उपस्थित होते.
















