न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑगस्ट २०२२) :- सीएनसी मशिन बनवून देण्याबाबत सांगितले. मशिन बनविण्यासाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी वेळोवेळी पैशांची मागणी केली. २१ ऑगस्ट २०२१ ला झालेल्या करारनाम्यानुसार ४ लाख १० हजार रुपये घेतले. मात्र, नंतर मशिन व इतर साहित्य न देता फिर्यादी यांची ४ लाख १० हजार रुपयांची आरोपींनी फसवणूक केली.
ही घटना भोसरीतील भगतवस्ती येथील मेकट्रोन इंडस्ट्रीज येथे घडली. कुलदीप ओमप्रकाश त्रिवेदी (रा. खानबावडी, रतलाम, मध्यप्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. किरण शिवदासन आचार्य (वय ३९, रा. पांजरपोळ, इंद्रायणीनगर, भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.
















